महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने एका कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे. या कायद्यात बलात्कार प्रकरणाची त्वरित सुनावणी करणं तसचं कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद करण्यात आल्या आहेत.
तर यातली सगळ्यात महत्त्वाची तरतुद ही की दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याची आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.
तसेच या नवीन कायद्याुसार बलात्कार प्रकरणी चार महिन्याच्या आत निकाल लावला जाणार आहे. बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्याचे नॅशनल रजिस्टर तयार केलं जाणार आहे. तर पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे.
यासाठी राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालये देखील उभारली जाणार आहेत. याला लागणारा निधी हा पंतप्रधानांकडून येणार आहे.
दरम्यान, मध्यंतरी लाहोर मध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. देशभरात झालेल्या आंदोलनानंतर सरकारने हा कायदा आणण्याचे पाऊल उचलले आहे.
वाचा – रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन पोलिसांच्या ताब्यात; हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप
कंत्राटी शेतीचा कायदा सर्वात आधी महाराष्ट्रातच” -देवेंद्र फडणवीस