माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे द प्रेसिडेंनशिअल इयर्स हे पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होणार आहे. मात्र या पुस्तकाच्या प्रकाशानावरून सध्या त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरु आहेत.
त्यांचा मुलगा व लोकसभेचे खासदार अभिजीत मुखर्जी यांनी मंगळवारी द प्रेसिडेंनशिअल इयर्स प्रकाशित करण्यास नकार दिला आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्याची हस्तलिखित कॉपी पाहण्याची मागणी अभिजीत यांनी केली. मात्र, त्यांच्या या मागणीस प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जीने नकार दिला आहे.
दरम्यान, ते जिवंत असताना त्यांनी स्वतः हे पुस्तक लिहिले असून त्याचे कमी किमतीमध्ये प्रकाशन होणे हे कधीही योग्य राहील अशी प्रतिक्रिया शर्मिष्ठा यांनी दिली.
The memoir, 'The Presidential Years', by former President Pranab Mukherjee is scheduled for a global release in January 2021https://t.co/egan29YxnN
— Rupa Publications (@Rupa_Books) December 13, 2020
दरम्यान, हे पुस्तक जानेवारी मध्ये प्रकाशित होणार असून, ११ डिसेंबर रोजी प्रकाशक रूपा बुक्सने या पुस्तकाचा काही भाग प्रकाशित केला आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला आहे.