उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या घटनेप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप, रवी, लवकुश, रामू यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार आणि खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सीबीआयने अंतिम तपास अहवालात नमूद केल्याप्रमाणे पीडित तरुणी शेतावर जात असताना आरोपी संदीप, रवी, लवकुश आणि रामू यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या असल्याचे सांगितले आहे.
सध्या आरोपी संदीप, लवकुश, रवी व रामू हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावरील न्यायवैद्यकीय चाचण्या गांधीनगर येथील प्रयोगशाळेने करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची सुनावणी सीबीआयने गाझियाबाद विभागाकडे दिली होती. यानंतर सीबीआयच्या तपास पथकाने मुलीवर सुरुवातीचे उपचार जेथे करण्यात आले, त्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या डॉक्टरांची भेट घेतली होती. या प्रकरणी सीबीआयने मुलीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत.
हे पण वाचा: ‘मला माझ्या मुलीचा चेहरा ही पाहू दिला नाही’ हाथरस प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
प्रकरण काय होते?
गेल्या १४ सप्टेंबरला हाथरस येथे दलित तरुणीवर जातीय द्वेषातून चार उच्चजातीय तरुणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. यानंतर २९ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
पुढे तिच्या मृत्युनंतर उत्तर प्रदेशातील पोलीसांनी मुलीच्या कुटुंबाची परवानगी न घेता रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. तर पोलीसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करताना हलगर्जीपणा केला होता. या सगळ्या प्रकरणानंतर देशभरातून पिढीतेला न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्यात आला.