भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात त्यांची कामगिरी देशासाठी खूप महत्वपूर्ण ठरली,असे ते म्हणाले.
कोरोना काळात मोदींनी जे कार्य केले ते मनापासून केले, त्यात कोणताही दिखावा नव्हता असे देखील ते म्हणाले. रतन टाटांनी सांगितलं की मी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक महामारींना सामोरे गेलो, मात्र कोरोनाचा काळ हा सर्वात भयानक ठरला.
हे पण वाचा: लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत मोदी सरकारचा सर्वात ‘मोठा’ खुलासा
देशाचे आर्थिक गणित हे पार बिघडले होते. मात्र या काळात मोदींनी केलेल्या कार्याबद्दल मला आदर वाटतो. त्यांनी लॉकडाऊन केले, दिवे लावून देशवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले. हे सर्व मनापासून होते यात कोणताही दिखाऊपणा नव्हता असे ते म्हणाले.
दरम्यान, कोरोनामुळे जून -एप्रिल मध्ये अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के इतकी घट झाली. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर या काळात ७.५ टक्के इतकी घट झाली. याच दरम्यान, देशातील गरिबांना मोफत अन्न व रोजगार उपलब्धतेसाठी अनेक उपाय भारत सरकारने केले.
दरम्यान, शेती सुधारणेसाठी चालना दिली, भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी १० हून अधिक क्षेत्रांशी संबंधित धोरणे आखली, असे टाटा यांनी असोचेम फाउंडेशन वीकच्या संमेलनात संवितले.