भारतात गाई बैल याच्या कत्तलीवरून अनेक वाद झालेले समोर आले आहेत. तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास सक्त मनाई आहे.
परंतु मृत गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणं गुन्हा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले आहे. जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे. यात न्यायलयाने मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणं हा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान १४ डिसेंबर रोजी शफिकउल्लाह खान या गाडी चालकाने यासंदर्भातली याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायलयाने हा निर्णय दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
सुरेश रैनासह इतर सेलिब्रिटींवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण
ओवैसींनी साधला मोदी सरकारवर निशाणा म्हणाले…