लॉकडाउनच्या काळात थेटर्स बंद असल्यामुळे अनेक मराठी सिनेमे प्रदर्शनाअभावी खोळंबले होते. याला पर्याय म्हणून बरेच सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग केले गेले. याला अपवाद फक्त मराठी सिनेमांचा होता. राज्यसरकारनं थेटर्स चालू करण्यास परवानगी दिली असली तरी कोणत्याच नव्या मराठी सिनेमाचा आस्वाद मात्र, मराठी सिनेरसिकांना मिळाला नाही.
नव्या वर्षात म्हणजेच २६ जानेवारी २०२१ ला समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिंग हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. याआधी चौर्य, वाघेऱ्या या सिनेमांचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी केलं आहे. तसेच स्त्रीलिंग पुल्लिंग या मराठी वेबसिरीजच दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.
डार्लिंग या सिनेमात प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाचं पोस्टर आणि टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं. अखेर आज या सिनेमाचा संपूर्ण ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
सुरेश रैनासह इतर सेलिब्रिटींवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण