देशभरात विविध भागातून कृषी कायद्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. शेतकरी विविध मार्गांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यात एक आजीबाई गाडी चालवताना दिसत आहेत.
आजी बाईंसोबत काही महिला देखील या गाडीत आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजीबाई थेट पंजाबमधील पटियाला येथून दिल्लीवरच्या सिंघू बॉर्डरवर पोहोचल्या आहेत.
62 वर्षाच्या या आजीबाईचा थाटात गाडी चालवताना दिसत आहेत. मनजीत कौर असं या आजीबाईंचं नाव असून पंजाब मधील पटियालापासून गाडी चालवत दिल्ली जवळच्या सिंघु बॉर्डरवर आल्या आहेत. हा फोटो ट्विटरवर Diljit Dosanjh ने शेअर केला आहे.
Baba Karu Kirpa ???? pic.twitter.com/gJCG5fUtnk
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 22, 2020
दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी कायद्याविरोधात गेल्या महिनाभरापासून आंदोलनं सुरू आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होत आहे. मात्र त्यातून कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष निघत नाही. शेतकरी देखील आंदोलनातून मागे हटायला तयार नाहीत.