21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनी आर्या राजेंद्रन ही केरळची राजधानी तिरुअनंतपुरमची नवीन महापौर असणार आहे. अशी माहिती हिंदुस्तान टाईम्सने शुक्रवारी दिली. देशातील सर्वात कमी वयात हे पद मिळविणारी ती सर्वात तरुण व्यक्ती असेल. आर्या ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सदस्य आहे. आणि आता देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून तिची गणना होणार आहे. आर्या ही बीएस्सी (गणित) शाखेची विद्यार्थिनी असून स्टुडन्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत होती.
आर्या ही सर्वात कमी वयाची उमेदवार होती. आर्यांच्या विरुद्ध बाजूने यूडीएफची श्रीकला ही उमेदवार होती. मात्र आर्याने तिला २८७२ मतांनी हरवले आहे. आम्ही जास्तीच जास्त सुशिक्षित महिलांना प्राधान्य देतो असे मत सिपीआयने मांडले आहे. थिरुअनंतपुरमच्या मुदवनमुगल या वार्डामधून तिने निवडणूक लढवली होती. एवढ्या लहान वयात निवडणूक लढवण्याची संधी तिला मिळाली. आणि महापौर म्हणून ती निवडून सुद्धा आली, यात १०० पैकी एकूण ५२ जागांवर सिपीआय ने बाजी मारली आहे.
दरम्यान, “मी एक विद्यार्थिनी असल्यामुळे लोकांनी मला निवडले आहे, लोकांना सुशिक्षित प्रतिनिधी हवा आहे म्हणूनच मला त्यांनी निवडले असे मत तिने व्यक्त केले. या पदाबद्दल अजून काही माहिती तिला मिळाली नाही. मात्र आपण आनंदाने ही जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही तिने सांगितले.” आर्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांचा प्रभाव आहे, तर नव्या पदासह आर्या आपलं शिक्षणही पुढे सुरु ठेवणार असल्याची माहिती ही तिने दिली.
महत्वाच्या बातम्या – भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांना केंद्र सरकार कोणतेही पाठबळ देत नाही -संजय राऊत