राजकीय रिंगणात कायम एकमेकांवर बोचरी टीका करणे, आरोप- प्रत्यारोप करणे हे चालूच असत. यात विरोधी पक्ष कायम आघाडीवर असतात. राज्यात ही सध्या असच काहीसं सुरु आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी नुकतीच शिवसेनेवर टीका केली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाचपेयीजी यांची जयंती झाली. या जयंती निमित्त ठाण्यामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गीता वाचन व वंदेमातरमचे आयोजन करण्यात आले होते.
एकीकडे महाराष्ट्रात शिवसेना ही अजाणची स्पर्धा घेतेय. अशावेळी गीता वाचन व वंदेमातराम् च्या स्पर्धेच्या माध्यमातून भाजप पुन्हा एकदा लोकांचे भाव राष्ट्रहिताकडे आणण्याचा प्रयत्न करत आहे यातून शिवसेनेने अक्कल घ्यावी अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, कर्तव्य व भावना यांच्यात सांगड घालण्याचे काम हे गीतेने केले आहे तर वंदेमातरमच्या माध्यमातून राष्ट्रगाणं व राष्ट्र भावना उस्फुर्तपणे जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या – बघतोच ती काय करतेय, कुणाला बोलवायचं आहे त्याला बोलवा! रुपाली चाकणकरांना धमकीचा फोन
पर्यावरणाच्या जनजागृती करण्यासाठी विदर्भातील २१ वर्षीय तरुणी करतेय “हा” सुत्य उपक्रम!
२१ वर्षाची आर्या राजेंद्रन देशातील सर्वात तरुण महापौर!
भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांना केंद्र सरकार कोणतेही पाठबळ देत नाही -संजय राऊत