चंद्रपूर | शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या कृषि आणि उद्योग क्षेत्रासाठी होत असेल, तर संजय राऊतांनी पवारांना मुख्यमंत्री बनण्याची विनंती करावी, अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधताना मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवार उत्तम नेतृत्व करत असतील तर राज्याचेच नेतृत्व करायला त्यांना काय हरकत आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला तर पर्यायाने देशाला होईल.
कृषि आणि उद्योग क्षेत्राला पवारांच्या अनुभवाचा फायदा होत असेल तर संजय राऊतांनी ‘काँग्रेसने काय करावं?’ हा सवाल विचारण्याऐवजी पवार साहेबांनाच मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह केल्यास राज्याची जोरदार प्रगती होईल, असं खोचक वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं आहे.
दरम्यान सत्ता हाती असलेल्यांना योग्य नियोजन केलं नाही. राज्य सरकारला मराठा समाजाच्या कुटुंबाची कमी मात्र स्वतःच्या कुटुंबाची चिंता जास्त होती. भाजप सरकारच्या काळात मिळालेलं आरक्षण राज्य सरकारला टिकवता आलं नाही, मात्र सरकारनं ऐकमेकांचे पाय ओढण्यातच वेळ खर्ची घालवला, अशी टीकाही त्यांनी यावेळेस केली आहे.