सगळ्या जगाची कोरोना विषाणूशी लढताना दमछाक झाली असताना कोरोनाच्या नव्या स्टेनमुळे पूर्ण जग पुन्हा दहशतीच्या सावटाखाली आलं आहे. यातून भारतीयांना लस मिळणार याच्या बातम्या समोर येत असताना पुन्हा एकदा काळजीत टाकणारी गोष्ट समोर आली आहे. Pfizer लशीनंतर अजून एका लाशीची ॲलर्जी होत असल्याचं दिसून आलं आहे.
मॉडर्ना लस घेतल्यानंतर बोस्टनमधील डॉक्टरांना ॲलर्जी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यांना आधीपासूनच शेलफिश ॲलर्जी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याबद्दल न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात वृत्तान्त देण्यात आला आहे.
ही लस घेतल्यानंतर त्यांच्या छातीत धडधड तसेच चक्कर आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.या गोष्टीमुळे पूर्ण जग पुन्हा एकदा काळजीच्या गर्तेत ढकललं गेलं आहे. आता भारतातील लस ही सुरक्षित आहे असं दिसून येतं आहे, त्यामुळे आता या लशीला परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.