भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच कठोर कायदा केला आहे. योगींच्या पावलावर पाय ठेवत मध्य प्रदेश सरकारनंही काल ‘धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020’ ला मान्यता दिली आहे.
या नव्या कायद्याने जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणत असलेल्या व्यक्तीस दहा वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि एक लाख रूपयापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानं कथित लव जिहाद प्रकरणांना जबरदस्त आळा बसेल, असा विश्वास राज्य सरकारकडून आता व्यक्त केला जात आहे.
मध्य प्रदेशाच्या हिवाळी अधिवेशनाची आजपासून सुरूवात होणार आहे. कालच मंत्रिमंडळाने या विधेयकावर मोहर उमटविल्याने आज चर्चेसाठी हे विधेयक विधीमंडळाच्या पटलावर सादर केले जाईल.
दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात महिन्याभरापूर्वीच लव जिहाद विरोधी कायद्याला मान्यता दिली आहे. याप्रकरणी युपी पोलिसांच्या कारवाईच्या कित्येक घटनाही पहायला मिळाल्या आहेत. मध्यप्रदेशच्या कायद्यानं आता कथित लव जिहाद रोखला जाईल का, हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे.