नवी दिल्ली | हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. हिंदुत्व हे त्याच्या मुळातच असल्यानं कोणताही हिंदू देशविरोधी असूच शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
‘Making Of a Hindu Patriot- Baground Of Gandhi’s Hind Swaraj’ या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना भागवत म्हणाले की, महापुरूषांना कधीच आपल्या सोयीनुसार परिभाषीत करू नये.
गांधीजींचे हे पुस्तक व्यापक संशोधित असून यापेक्षा कुणाची काही वेगळी मते असतील तर तीदेखील मांडू शकतात. कोणाच्या असण्यानं धोका आहे अशी भीती जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत सौदे होतील पण आत्मियता कधीच निर्माण होणार नाही, अशी भूमिका देखील त्यांनी यावेळेस मांडली.
दरम्यान हिंदू हा झोपलेला असू शकतो, पण त्याला उभं करावं लागत अस मत व्यक्त करतानाच त्यांनी हिंदुत्वाच्या बाजूची मांडणी या कार्यक्रमात पुरेपुर केल्याचं पहायला मिळालं.