औरंगाबाद शहराच्या नामांतरण वादात मनसेचे संदीप देशपांडे यांनी उडी घेतली आहे. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याची धमक आताच्या शिवसेनेत नसल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.
लोकशाही टीव्हीसोबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘राज्य सरकारला औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर जे काही होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असणार आहे.’
‘औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर करण्याची भूमिका जुन्या शिवसेनेची होती आताच्या शिवसेनेत नामांतर करण्याची धमक नाही आताच्या शिवसेनेने मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाला तितांजली दिली आहे,’ असे देखील संदीप देशपांडे म्हणाले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा नामांतराला विरोध
औरंगाबाद शहराच्या नामांतराला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला आहे. महाआघाडी सरकार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. त्यामुळे शिवसेनेने जर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याची भूमिका मांडली तर, त्याला आमचा विरोध असणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.