चीनमधील अब्जाधीश आणि अलीबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. चिनी सरकारच्या धोरणांवर टीका केल्याने जॅक मा यांना विविध कारवायांना सामोरं जावं लागत आहे.
तरुण पिढीला प्रेरणादायी भाषण देण्यासाठी जॅक मा प्रसिद्ध आहेत.दोन महिन्यांपूर्वी शांघाय शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी चीन सरकारच्या बँकांच्या सावकारी धोरणांवर टीका केली होती.
अभिमानास्पद! बारामतीच्या अथर्वला मिळाला यंग सायंटिस्ट 2020 पुरस्कार
या प्रकरणानंतर जॅक मा यांच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ख्रिसमसच्या काळात अलीबाबा कंपनीच्या विरोधात चालू असणारा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत चीनच्या बाहेर जाता येणार नसल्याचे आदेश देण्यात जॅक मा यांना देण्यात आले होते. या प्रकरणात जॅक मा यांची अडचण कशाप्रकारे वाढेल, यासाठी खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लक्ष घातले असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी केला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आफ्रिका बिजनेस हिरोज या कार्यक्रमात जॅक मा अंतिम परीक्षक म्हणून सहभागी होणार होते. मात्र अचानक त्यांचं नाव काढून टाकण्यात आलं तसेच कार्यक्रमाच्या पोस्टवरून देखील त्यांचे फोटो हटवण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम यांच्याच कंपनीने तयार केला होता.
जॅक मा चिनी सरकार कडून होणाऱ्या कारवायांना कशा प्रकारे तोंड देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.