२०२० च्या कोरोना महामारीपासून जनतेला सावध करण्यासाठी तसेच नियम अटींचे पालन करा असा संदेश देण्यासाठी वेगवेगळया माध्यमांचा वापर करण्यात आला होता. यात कॉलर ट्यूनवरून देखील कोरोनासंदर्भात जागृती करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाजातील कॉलर टुयुनचा समावेश करण्यात आला होता. परंतु काही काळानंतर या कॉलर ट्यूनवर अनेकांनी आक्षेप घेतला. तर अनेकजन या ट्यूनला कंटाळले होते.
मात्र आता २०२१ च्या सुरुवातीनंतर कोरोना संबंधी चांगल्या बातम्या पाहता हि कॉलर ट्यून बदलण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जानेवारी पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. याच पार्श्भूमीवर कॉलर ट्यून पुर्णपणे बंद होणार नाही तर बदलण्यात येणार आहे. यामधून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
परंतु यावेळी कॉलर ट्यून हि अमिताभ बच्चन यांच्या नाही तर एका महिलेच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. या कॉलर ट्यूनचा हेतू देखील लसीकरणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा असणार आहे. ज्यात हिंदुस्थानी लसीवर विश्वास ठेवा… लसीसंदर्भातील अफवांवर बिलकूल विश्वास ठेवू नक.. असा संदेश देण्यात येणार आहे.