राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणानंतर अनेकांनी संबंधित महिला अनेकांना ब्लॅकमेल करत असल्याचे तिच्या विरोधात आरोप केले आहेत.
यामुळे पोलिस आपली एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार या महिलेने केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही.” असं म्हटलं आहे
तसेच “आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल. कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.