बलात्काराच्या मुद्द्यामुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक आणि न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या मुद्द्यावरून सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक लोकांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. याबाबत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा चर्चा आणि मागण्यांना उधाण आलं होतं, मात्र सध्यातरी या गोष्टींना अल्पविराम भेटणार आहे. राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत मुंडे यांचा तूर्तास तरी राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय झाला आहे.
काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यांनी याबाबत ओशिवारा या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत मुंडे यांनी त्यानंतर सर्वत्र धनंजय मुंडे यांच्यावरच चर्चा आणि टीकाटिपणी चालू होती. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्यानंतर तूर्तास तरी मुंडे यांचा राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय झाला आहे. हे प्रकरण ब्लॅकमेलिंगचं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राष्ट्रवादीमधील कोअर कमिटीची बैठक नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी पर पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
विरोधी पक्षातील नेत्यांचा देखील आरोप?
याबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी देखील खळबळजनक दावा केला आहे. आपल्याला देखील रेणू शर्मा यांनी फोन करून ब्लॅकमेल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं ते बोलले.
मनसे नेते मनीष धुरी यांनी देखील याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्याला देखील अशा प्रकारची नात्यासाठी गळ घालण्यात आल्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष केलं नाहीतर आपण देखील अडचणीत आलो असतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली.