नव्या वर्षातली बिग बजेट आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव ही वेबसीरिज ॲमेझॉन प्राईमवर आज स्ट्रीम करण्यात आली आहे. पण सीरिजमधील एका सीनमुळे ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सिरीजला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्या एका सिनमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
सिरीजमधला तो सिन कोणता?
“एका सीनमध्ये मोहम्मद जीशान अयुब एका रंगमंचावर भगवान शंकराच कॅरेक्टर प्ले करत आहे. तिथे आणखी एक व्यक्ती स्टेजवर येते. आणि शंकराच कॅरेक्टर प्ले करणाऱ्या अभिनेत्याला जीशान अयुबने शिवी दिली आहे.
Such hypocrites will not improve until they are flogged or boycotted from Bollywood..
These so-called secular Bollywood people would not dare to make even a small comment about people of any other religion.?#Tandav #TandavOnPrime #EnoughIsEnough pic.twitter.com/OkrAkl1cyD
— Jagpreet Singh?, RW (@Titan_Jagpreet) January 15, 2021
यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अनेकांनी यावर नाराजी दर्शवली, तर काहींनी आक्षेपही घेतला आहे. ही वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिरीजच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी भूमिकाही काहींनी घेतली आहे.