राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेत्यांनी आघाडीवर चांगलाच निशाणा साधला आहे. आपल्यावरील आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. यानंतर शरद पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
परंतु त्यांच्या या भेटीनंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी “पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी,” असं म्हणत शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टांगती तलवार धरली आहे.
पाठी मागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी… https://t.co/MRgK3g4E7g
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021
आपल्या एका ट्विट मधून त्यांनी “पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,” असं म्हणत या भेटीवर टिका केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. https://t.co/MRgK3g4E7g
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021