शिवसेना खासदार संजय राऊत ह्यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत सहकुंटुंब भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राऊत यांनी सहकुंटूंब भेट दिली.
यावेळी संजय राऊत यांची मोठी मुलगी उर्वशी राऊत आणि पत्नी वर्षा राऊत ह्या देखील यावेळी उपस्थित होत्या. पुर्वशी हीचा साखरपुडा सोहळा येत्या काही दिवसात संपन्न होणार आहे, पवार कुटुंबीयांना याच कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी राऊत सहकुटुंब सिल्वर ओकवर पोहोचले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली @vaibhavparab21 pic.twitter.com/7KEC2CPFvC
— ABP माझा (@abpmajhatv) January 15, 2021
दरम्यान, ही भेट फक्त कौटुंबीक होती का यामागे काही वेगळं कारण होतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.