राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीवर चांगलच निशाणा साधला. दरम्यान “इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत” असे ट्विट करत निलेश राणेंनी देखील राष्ट्रवादीवर टिका केली.
त्यांच्या या टिकेवर प्रतिक्रिया देत “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणले आहे.
मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 14, 2021
दरम्यान “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत,” अश्या भाषेत राणेंनी आपल्या ट्विट मधून राष्ट्रवादीवर टांगती तलवार धरली होती.