कृषी विधेयकाच्या विरोधात गेली ४० दिवसा झाले शेतकरी दिल्लीत ठाण मांडुन बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषणाला बसणार आहेत.
“कॉंग्रेस काळात देखील सरकार विरोधात आंदोलन केल्याने मला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, मात्र ते कॉंग्रेसला चांगलंच महागात पडलं होते, त्यामुळे आपलं कोणी काही करु शकत नाही ह्या भ्रमात केंद्र सरकारने राहू नये” असा इशार अण्णांनी सरकारला दिलाय.
लोकशाहीत मतदार हा राजा आहे, त्याने काही मनात आणलं तर देशात काहीही होउ शकतं. लोकशाहीत शांतता आणि अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. यामुळे या महीन्याच्या अखेरीस आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी सांगितले.