महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच सरकारच्या वर्मावर बोट ठेवले आहे. आव्हाडांनी कल्याणच्या रस्त्याबद्दल बोलताना आपल्याच सरकारची कानउघडणी केली आहे. महाराष्ट्रात एवढे वाईट रस्ते कुठेच नसतील असे यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“कल्याणच्या रस्त्यांची अवस्था मला बघवत नाही, बदलाची गरज आहे आणि हा बदल घडवण्यासाठी तरुणाई ने सक्षम होऊन पुढाकार घ्यावा”. असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. यासोबत डोंबिवली शहरात काँक्रीट रस्त्याची कामे सुरू आहेत तरीदेखील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, “चांगला रस्ता शोधून दाखवण्याची स्पर्धा आयोजित करा”अशा शब्दांत त्यांनी आपल्याच सरकारला टोला लगावला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर देखील उपस्थित होते.