महाराष्ट्रात आज ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. मात्र यात जळगावात निवडणुकीच ऐतिहासिक निकाल समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणुक लढवत असलेल्या अंजली पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
अंजली पाटील ह्यांनी जळगाव जिल्हातील भादली बुद्रुक या गावातुन निवडणुक लढवली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी लिंग ह्या रखाण्यासमोर पुरुष किंवा स्त्री असा उल्लेख न करता इतर असा उल्लेख केलेला होता. यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. या विरोधाच त्यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केलेली होती. यात औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल अंजली पाटील ह्यांच्या बाजूने दिल्यावर त्यांना निवडणुक लढवण्याची संधी मिळाली होती.
ह्या लढ्यात त्यांच्या सहकारी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणी सदस्य शमिभा पाटील यांनी विशेष सहाकार्य केलेले होते. अंजली पाटील ह्या राज्यातील एकमेव तृतीयपंथी व्यक्ती होत्या ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यामुळे हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे.