महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रंमधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष आहे असा दावा केला गेला होता, मात्र यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. यावर भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचे म्हणत आहे, मात्र हे साफ खोट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
कालच्या निवडणुकीमध्ये भाजप साफ हरले आहे. मात्र आम्ही एक नंबर ला आहोत अशी दवंडी भाजपद्वारे पिटली जातेय. मात्र हे सर्व साफ खोट आहे असे ते म्हणाले याअगोदर झालेल्या चिन्हांवरील निवडणूक सुद्धा त्यांना जिंकता आल्या नाहीत अशी टीका देखिल त्यांनी केली आहे. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे ते खोटा दावा करत आहेत. या निवडणुकातील 80 टक्के जागा या महाविकास आघाडीच्या आहेत. भाजपला यात धूळ चारली गेली आहे. भाजप फक्त खोटे दावे करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहे.
दरम्यान, आमच्या पक्षातील काही नेते हे सत्तेच्या दबावाखाली असल्यामुळे भाजपमध्ये गेले होते, मात्र आता त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये, अशी टीका त्यांनी केली आहे.