सोमवारी पार पडलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ऋतुराज रवींद्र देशमुख या 21 वर्षीय तरुणाने बाजी मारली आहे. ऋतुराजने BSc पर्यंतचं शिक्षण आहे. सध्या तो पुण्यात LLB साठी प्रवेश घेण्याची तयारी करत आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावच्या निवडणुकीमध्ये ऋतुराजने 38 मतांनी विरोधी उमेदवारावर वियज मिळवला आहे. त्याने निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं होत तेसुद्धा जिंकून आणलं आहे.
“अगदी तालुक्यापर्यंत मला हरवण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो. आम्हा तरुणांना राजकारणापेक्षा गावच्या विकासात जास्त इंटरेस्ट आहे. जुन्या मंडळींना खुर्ची धरून ठेवण्यात रस जास्त आहे. आमचं तसं नाही.” असे ऋतुराजने बीबीसीशी बोलताना म्हणले आहे.