कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी रसत्यावर उतरला आहे. सरकार व शेतकऱ्यांमध्ये अजूनही वाद सुरु आहेत. अश्यातच आता महाराष्ट्रतूनही शेतकऱ्यांना पाठिंबा मिळणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहेत.
यासाठी मुंबईमध्ये तीन दिवस आंदोलन केले जाणार आहे. व या आंदोलनासाठी स्वतः शरद पवार उवस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठी शरद पवार हे रस्त्यावर उतरणार असून, 23, 24,व 25 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे हे आंदोलन होणार आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम कृषी कायद्यांना विरोध केला आहे. यामुळे शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.