रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या व्हाट्स अँपचॅटचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यामुळे अर्णव वरती सध्या प्रचंड टीका होत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपची बोलती बंद केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावरून भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
तांडव मधील सिनला भाजपचा विरोध आहे, त्यावर बोलणं गरजेचं आहे मात्र अर्णब बद्दल कोणी काहीच का बोलत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अर्णब गोस्वामी व ब्रॉडकास्ट ऑडिइन्स रिसर्च कौन्सिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉटअँप चॅट व्हायरल झाले आहे. यात पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांबद्दल आनंद व्यक्त केला गेला आहे.
अर्णबचे चॅट समोर आल्यामुळे मुंबई पोलिसांवर कारवाई करा असे म्हटले गेले, अरे शेम्बडयानो अर्णवने देशाची गुपित माहित उघड केली ते बघा आधी, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
दरम्यान, बालकोट हल्ल्याबद्दल आधीच माहिती असल्याचे या चॅटमधून समोर येत आहे. या मुद्द्यामुळे शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.