बुधवारी जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. अमेरिकेत झालेल्या या सत्तांतराचे देशभरातून स्वागत झाले. यासोबत जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे अनेक देशांच्या प्रमुखांनी अभिनंदन केले. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही सामावेश होता.
बायडन यांचा शपतविधी सोहळा पार पडल्यानंतर मोदी यांनी “भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असे ट्विट करत बायडेन यांचं अभिनंदन केले.
तसेच त्यांनी कमला हॅरिस यांचे हि अभिनंदन करत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन. हा ऐतिहासिक क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आशादायी आहे. भारत-अमेरिका भागीदारी विश्वासासाठी फायदेशीर असल्याचे म्हणाले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असे देखील आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणले आहेत.