गेले अनेक दिवस झाले औरंगाबादच्या नावावरून वाद सुरू आहेत. हे नाव बदलून संभाजीनगर नाव ठेवावे अशी मागणी केली जात आहे, मात्र यावर आता आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोणत्याही शहराचे नाव जेव्हा बदलतो तेव्हा तेथील जनतेचे मत आधी जाणून घेणे गरजेचे असते, असे मत रोहित पवार यांनी मांडले आहे. शिवसेनेकडून नाव बद्दलण्याची जरी मागणी होत असली तरी, तेथील नागरिकांचे मत हे महत्वाचे ठरते.
“त्या शहरात राहणाऱ्या लोकांना आधी तुम्ही विश्वासात घ्या, त्यांचे मत जाणून घ्या यानंतर जो काही असेल तो निष्कर्ष ठरवा” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या मताला ताकद देण्याची जबाबदारी ही सारकारची आहे. असे सुद्धा ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलले. दरम्यान, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न हा सध्या महत्वाचा प्रश्न वाटतो.
दरम्यान, अजून अनेक प्रश्नावर काम करायचं आहे असेदेखील त्यांनी सांगितले, सध्या वाढीव वीज बिलाबद्दल सरकारने विचार करायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले.