रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट प्रकरणं उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे..
यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हि भाग घेतलाय. “अर्णब गोस्वामी यांच्यासारखी माहिती आपल्या लष्करातल्या जवानानं केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल केलं असतं. त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं असतं. त्याला देशाच्या सुरक्षेसाठी धोकाही मानलं असंत. आज केंद्रात काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार असतं आणि भाजप विरोधी पक्ष असता तर त्यांनी याविषयावरून तांडव केलं असतं. परंतु आता भाजप गप्प का?,” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी आंदोलन, सीरम इन्स्टीट्यूमध्ये लागलेली आग अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी “देशाच्या सुरक्षेविषयी, किंवा सुरक्षेला धोका निर्माण होणारी माहिती लीक होती तरी कारवाई का होत नाही? ” असे राऊत म्हणले आहेत.
तसेच शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रीया देत “सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सरकारनं माघार घ्यावी असं आपलं म्हणणं नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का?,” असा सवाल राऊतांनी केंद्राचा केला आहे.