नगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक होणार असून, आता या निवडणुकांसाठी पवार फडणवीस आमने- सामने येणार आहेत. राज्यात सहकारी संस्था निवडणुकांना मुदतवाढ दिली गेली आहे, मात्र नगरच्या जिल्हा बँकेची निवडणूक ही होणार आहे. नेहमीप्रमाणे विखे-थोरात यांच्यात लढत होणार आहे.
हि लढत म्हणजे पवार- फडणवीस यांच्यात संघर्षाची लढत ठरणार आहे. दरम्यान, भाजपची याबाबत बैठक झाली असून, शरद पवार हे देखील रविवारी नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे पवारांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष वेधून आहे.
संचालक मंडळाच्या 21 जगासाठी ही निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा अर्ज भरण्याची 25 जानेवारी ही शेवटची मुदत आहे. 20 फेब्रुवारीला हे मतदान होणार असून, याचा निकाल काय असेल याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिले आहे.