दोन दिवसांपुर्वी पुण्यातील सिरम इन्सिट्युटला आग लागल्याता धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात सिरम इंन्सिट्युटची भेट घेतली.
यावेळी सिरम इंन्सिट्युटचे अदर पुनावाला उपस्थित होते. सिरम इंन्सिट्युटने भारतीय बनावटीचे कोव्हिशिल्ड लस बनवल्याने ही कंपनी सध्या जगभरात चर्चेत आहे. संपुर्ण भारतभर ह्या लसीचे सध्या वितरण सुरु आहे. पण ह्याच हा अपघात होणं हे देशासाठी धक्कादायक आहे, यामुळे संपुर्ण देशभरातुन याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, सिरम इंन्सिट्युटचे प्रमुख आणि शरद पवार यांचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत.