भविष्य माणूस मंगळावर गेल्यावर सोबत ऑक्सिजन घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. कारण मंगळ ग्रहावरच ऑक्सिजन तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी नासाने घेतली आहे. नासाच्या Perseverance रोव्हरमध्ये असलेल्या मॉक्सी यंत्राने चक्क 5 ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्याची किमया साधली आहे. एवढ्या ऑक्सिजनने अंतराळवीर दहा मिनिटांसाठी जिवंत राहू शकतो.
मंगळाचे वातावरण कार्बन डाय-ऑक्साइड या वायूने तयार झालेलं आहे. या कार्बन-डाय-ऑक्साइड वायूचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचं काम रोव्हरवर बसवण्यात आलेल्या मॉक्सी यंत्राने केलं आहे.
मॉक्सी यंत्र म्हणजे नेमकं काय?
मॉक्सी म्हणजे Perseverance रोव्हरवर बसवलेलं एक टोस्टरच्या आकाराचे छोटेसे यंत्र आहे. या यंत्राने मंगळ ग्रहावर असणाऱ्या कार्बन-डाय-ऑक्साईडच्या माध्यमातून पाच ग्रॅम ऑक्सिजन तयार केला आहे. या ऑक्सिजनच्या मदतीने अंतराळवीर साधारण दहा मिनिटे जिवंत राहू शकतो. नासाच्या शास्त्रज्ञानुसार हे यंत्र तासाला दहा ग्रॅम ऑक्सिजन तयार करू शकतं.
सध्या जरी हे प्रमाण कमी असलं तरी नासा म्हणते की भविष्यातील मोहिमांसाठी मोठ्या आकारातील मॉक्सी यंत्र मंगळावर घेऊन जाता येऊ शकतात. त्यामुळे तिथं ऑक्सिजनची घेऊन जाण्याची गरज नाही.
मंगळावर कार्बन-डाय-ऑक्साईडची अजिबात कमतरता नाही
मंगळ ग्रहाचे वातावरण जवळपास कार्बन डाय-ऑक्साइड वायू बनलेलं आहे. या ग्रहावर 96 टक्के कार्बन -डाय-ऑक्साईडचे प्रमाण आहे. तर ऑक्सिजनचे प्रमाण फक्त 0.13 टक्के आहे. हेच प्रमाण पृथ्वीवर 21 टक्के आहे.
त्यामुळे जर भविष्यात मंगळ ग्रहावर वसाहत बसवायची असेल तर ऑक्सिजनची गरज भागविणे गरजेचे आहे. म्हणून मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्माण करण्यासाठीचे तंत्रज्ञान आवश्यक आहे. नासाने या चाचणीतून आपण मंगळ ग्रहावर यशस्वी ऑक्सिजन तयार करू शकतो, हे दाखवून दिलं आहे.
हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी
या अगोदर नासाने Inginuity नावाच्या हेलिकॉप्टरची मंगळ ग्रहावर चाचणी घेतली होती. ही देखील चाचणी यशस्वी झाली आहे.
या चाचणी यशस्वी झाल्याच्या बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की नासानं हेलिकॉप्टरची चाचणी मंगळावर नेमकी का घेतली असावी. तर त्याला कारण आहे की मंगळाचे वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळं आहे. तेथील वातावरण पृथ्वीपेक्षा शंभर पटींनी विरळ आहे.
त्यामुळे मंगळावर हवाई उड्डाणासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जाणार, त्याची चाचणी मंगळ ग्रहावर घेणं गरजेचं आहे. या हेलिकॉप्टरची चाचणी देखील यशस्वी झाल्याने भविष्यात मंगळ ग्रहावर हवेतून प्रवास करणं शक्य होणार आहे.
आता नासाकडून मॉक्सी तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीमुळे भविष्यात माणूस लवकरच मंगळावर जाऊ शकतो, यात शंका नाही.