महाराष्ट्र | २०२१ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार तर खाजगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर आपण प्रवेशासाठी अर्ज करु शकता, यात एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज “MahaITI App” या मोबाईल ॲपच्या आधारे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना ११ वेगवगळ्या अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे.
प्रवेश प्रक्रिया, नियमावली, पद्धती, आवश्यक कागदपत्रे, संबंधित शासन निर्णय, विविध योजना, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता, इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या | महाराष्ट्रात गुणांचा पाऊस, तब्बल “इतक्या” विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण…
ब्रेकिंग: १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर होणार; ‘या’ वेबसाईटवर पहा निकाल