कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मात्र आता आय़पीएल स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे, आणि यात क्रिकेट प्रेमींना सुरुवातीलाच महामुकाबला पाहायला मिळणार आहे.
आयपीएलचे उर्वरित सामने येत्या १९ सप्टेंबर पासून सुरु होत आहेत. यासाठी बीसीआयने या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. यात पहिल्याच सामना हा मुंबई इंडिसन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्स असा रंगणार आहे.
यामुळे क्रिकेट चाहत्यांना पहिल्याच सामन्यात मेजवानी मिळणार आहे. तर यात एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत, यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, विराटच्या बंगलोर संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी केली होती, यामुळे विराट यंदा तरी आयपीएल स्पर्धा आपल्या नावावर करणार का? असा प्रश्न देशभरातील चाहत्यांना पडला आहे.