आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत असणारी अभिनेत्री Ketaki Chitale केतकी चितळे हि पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
केतकी चितळे हिने १ मार्च २०२० रोजी सोशल मीडियावर नवबौद्ध समाज ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क अशी पोस्ट केली होती. तिच्या या पोस्टवर अक्षरशः टीकेची झोड उठली होती.
तिच्या या विधानावर ॲड स्वप्नील कविता गोविंद जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात केतकी चितळे आणि सूरज शिंदे या दोघांवर अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर केतकी चितळे हिने अटक पूर्व जामिनासाठी ठाणे स्पेशल कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, काल कोर्टाने केतकीच्या अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, तिला आता जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये ॲड अमित कटारनवरे यांनी युक्तिवाद केला. तसेच सोबत ॲड स्वप्नील जगताप ॲड आदी कटारनवरे ॲड सतीश अंकुश यांनी या केसमध्ये त्यांना मदत केली.
वाचा | धक्कादायक! मनोहर मामावर महिला भक्ताकडून लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल
“परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले”
“माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच” धनंजय मुंडे यांचे सूचक वक्तव्य
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत होणाऱ्या आघाडीबाबत अजित पवारांचं मोठं विधान, वाचा