कोरोनाच्या कारणामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली होती, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर उर्वरित स्पर्धा दुबई येथे खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
१९ सप्टेंबरपासून IPL आयपीएल स्पर्धा सुरू झाली, विशेष म्हणजे या सामन्यांना प्रेक्षकांना देखील हजेरी लावता येणार आहे, या सिजनचा ३० वा सामना मुंबई विरूध्द चेन्नई संघांमध्ये पार पडला.
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १५७ धावांचे लक्ष ठेवलेले होते, यात मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडने ८८ धावांची जबरदस्त खेळी करत चेन्नई संघाला चांगली धावसंख्या उभारायला मदत केली,
चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करत या सामन्यात चेन्नईने मुंबईच्या संघावर २० धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे, यामुळे आता येणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.