Solapur | सोलापुरातील प्रसिद्ध केमिकल निर्माण करणारी बालाजी अमाईन्सने या कंपनीला फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत ७ वे स्थान मिळाले आहे. या यादीत स्थान मिळवणारी बालाजी अमाईन्स ही सोलापुरातील पहिलीच कंपनी आहे.
कोरोनाकाळात रेमेडीसीवर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात लागत होते. याच इंजेक्शनासाठीचे घटक तयार करण्यात देशातील आघाडीची कंपनी म्हणून बालाजी अमाईन्स कंपनी ओळखली जाते.
फोर्ब्सच्या २०२१ मधील यादीत भारतातील २६ नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. सोलापुरातील बालाजी अमाईन्स कंपनीचा सामावेश या यादीमध्ये आहे. बालाजी अमाईन्सची वार्षिक उलाढाल तब्बल १४४८ मिलियन डॉलर अर्थात १० हजार ६५२ कोटी इतकी आहे.
कोरोनासोबत लढताना औषधांची प्रचंड चणचण भासत होती. त्यामुळे औषध निर्मिती कंपन्या आणि पुरवठादार तेजीत आले होते. या कंपनीचे बाजारात सर्वप्रथम ७०० रुपये शेअर असलेल्या, या कंपनीचे शेअर आता तब्बल ५ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. ही खरंच सोलापूरकरांसाठी आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
वाचा | हिंदू धर्म खतरे मै है! ही केवळ काल्पनिक भीती – केंद्रीय गृह मंत्रालय
“नोकरशहा आमच्या चपला उचलतात” उमा भारतींच्या ‘या’ विधानावर रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
अनंत गीतेंच्या वक्तव्याचे देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन, वाचा
“तामिळनाडूप्रमाणे बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना मेडिकला प्रवेश द्यावा” – नाना पटोले