मेडिकल या विद्याशाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांना मेडिकल या विद्याशाखेत प्रवेश घेता येतो. परंतु अनेक ठिकाणी नीट या परीक्षेमुळे गैरप्रकार होत आहेत.
यामुळे बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली. नीट या प्रवेश परिक्षेमुळे अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
ही परीक्षा एनसीईआरटीच्या बेसवर असल्याने, राज्य शिक्षण महामंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणून महाराष्ट्रानेदेखील तामिळनाडूप्रमाणे बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश द्यावा. असे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे पटोले यांनी सांगितलं.
नीट या परीक्षेसाठी देशभरातून जवळपास १६ लाख विद्यार्थी बसतात. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडू सरकारने मेडिकल प्रवेशासाठी बारावीच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. असा निर्णय घेतला होता. आता महाराष्ट्रात हा निर्णय लागू होणार का? हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे
वाचा | अनंत गीतेंच्या विधानाबद्दल शिवसेनेचे नेते संजय राऊतांची प्रतिक्रिया, वाचा
‘कुण्या गावाची गं, कुण्या राजाची तू गं राणी’ असं म्हणत अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला
“मी लढत असलेली लढाई एक प्रकारची क्रांती आहे, त्यामुळे मी शांत बसणार नाही”
“फडणवीसांनी टाकलेल्या आमदारकीच्या तुकड्यासाठी पडळकर बेताल वक्तव्य करतात”