नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरीसेवा UPSC परीक्षेत देशातील अनेक राज्यांमधील मुलामुलींनी घवघवीत यश मिळवलं आहे. या परीक्षेत मुलांबरोबर मुलींनीही बाजी मारली आहे. सिमरन आणि सृष्टी या सख्ख्या बहिणी एकाचवेळी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
या परीक्षेत दिल्लीच्या रहिवासी सृष्टीला ३७३ वी तर सिमरनला ४७४ वी रँक मिळाली आहे.
दोन्ही बहिणींनी अभियांत्रिकी आणिअर्थशास्त्रातून पदवी संपादन केल्यानंतर, नामांकित कंपन्यांचे पॅकेज सोडून वडील नीरज कुमार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्याचं ठरवलं.
हे कुटुंब मूळचे ‘आग्रा’चे असून ते सध्या दिल्लीत राहतात. घरातील अपुऱ्या जागेमुळे दोन्ही बहिणींनी लायब्ररी जॉईन करून, अभ्यासाला सुरुवात केली. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक असून आई सुमन गृहिणी आहे. त्यांच्या या अद्वितीय यशामुळे कुटुंबियांबरोबरच देशभरातून त्यांचे कौतुक करण्यात येत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
“विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करताना कठोर परिश्रम आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून १०० टक्के देऊन तयारी करावी, म्हणजे यश अवश्य मिळते.” असं दोन्ही बहिणी सांगतात. “मला परदेशी सेवा निवडायची आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे माझे स्वप्न आहे.” असं सिमरन सांगते, तर “लहानपणापासूनच माझे वडीलांनी दिदींसारखी आयएस बनण्यासाठी प्रेरणा दिली. यामुळे अंतिम वर्षाला असताना वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी यूपीएससीची तयारी सुरू केली.” असं सृष्टीने सांगितलं.
वाचा | “आरोपींना अशी कडक शिक्षा व्हायला हवी, की पुन्हा असे कृत्य करण्याची इच्छा झाली नाही पाहिजे”
आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल राजेश टोपेंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी
पुणे : ३५ फूट उंची असलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगवरून तरुणाने मारली उडी
“या पठ्ठ्याने एका वर्षात सायकलवरून तब्बल २०० वेळा पुरंदर किल्ला सर केलाय”