मोबाईल क्षेत्रात सर्वाधिक नावाजलेला ब्रॅड म्हणजे APPLE, या कंपनीचे मोबाईल मार्केटमध्ये सर्वाधिक किंमतीचा असला तरी यात आपल्याला अनेक नवनविन आणि दर्जेदार फीचर्स पाहायला मिळतात,
नुकताच काही दिवसांपुर्वी Apple 13 हा मोबाईल मार्केटमध्ये आला होता, या मोबाईलच्या किंमतीवरून सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि भन्नाट पोस्ट पाहायला मिळत होत्या.
मात्र एवढा चांगला आणि महाग फोन तुमच्याकडून हरवलाच तर करायचं काय ? हा विचार तुम्ही कधीतरी केला असाल, आज आम्ही तुम्हाला याच बद्दल माहिती देणार आहोत.
कसा शोधण्याची प्रक्रिया कशी चालू करणार ?
१. फोनच्या सेटिंगवर जा, तुमच्या नावावर टॅप करा आणि नंतर “Find My” असा ऑप्शन तुम्हाला दिसेल.
2. जर ते आधीपासून नसेल तर तो ऑप्शन लगेच चालू करा.
3. आयफोन 11 आणि आयओएस 15 वरील वापरकर्ते “Find My network” हा ऑप्शन देखील निवडू शकतात. हे आपल्याला आपला फोन बंद किंवा ऑफलाइन असताना देखील ट्रॅक करण्यास अनुमती देईल.
4: जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी संपणार असेल तेव्हा तुम्ही तुमच्या आयफोनला तुमचे शेवटचे स्थान पाठविण्याची परवानगी देण्यासाठी “Send Last Location” या पर्याय देखील निवडू शकता.
यामुळे जर तुम्ही Apple य़ुजर्स असाल तर लगेच ही सेटिंग करून घ्या, म्हणजे तुमचा फोन हरवल्यावर काही वेळातच तुम्हाला तो मिळू शकतो.
वाचा | फेसबुक डाऊन झाल्यामुळे तब्बल १२०० कोटींचे नुकसान; मार्क झुकेरबर्गची संपत्ती देखील झाली कमी