दुबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा Virat Kohli दुबईच्या Dubai मादाम तुसा संग्रहालयात Madam Tusa मेणाचा पुतळा उभारण्यात आला असून, त्याचं अशा वेगळ्या प्रकारे स्वागत करण्यात आलं आहे. या गोष्टीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. हा विराटचा दुसरा पुतळा आहे.
याआधीही विराट कोहलीचा मेणाचा पुतळा लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर Lords cricket stadium उभारण्यात आला आहे. मादाम तुसा स्टेडियममध्ये विराट कोहली आणि इतर ६० मान्यवरांचे मेणाचे पुतळेदेखील उभारण्यात आले आहेत. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trumph, फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम David Backham, ऍक्शन स्टार जॅकी जैन jackie chan, टॉम क्रूज Tom Cruise यांचा समावेश आहे.
आयपीएलच्या मोसमानंतर आता टी ट्वेंटी T-20 विश्वचषकला Worldcup सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात मादाम तुसा इथं या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान भारताने इंग्लंड विरुद्ध सराव सामन्यात सात विकेटने मात करत जिंकला. इंग्लंडने २० षटकात १८९ धावांचं लक्ष भारताला दिलं होतं. भारताने हे आव्हान १९ षटकात पूर्ण केलं. या सामन्यात ईशान किशन Ishan Kishan आणि राहुलने उत्तम खेळी केली.
त्यांच्या उत्तम खेळीमुळे भारताला विजय मिळाला. विराट या सामन्यात फारशी कमाल करू शकला नाही. आता टी-ट्वेंटी विश्वचषकाची सुरुवात भारत करणार असून, पहिलाच सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असणार आहे. यामुळे सर्वांचंच लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे.