देशातला आघाडीचा कॉमेडियन मुनावर फारूकीचे मुंबईतील दोन स्टॅन्डअप शो रद्द करण्यात आले आहेत. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील बोरीवली आणि बांद्रा या ठिकाणी ३० आणि ३१ ऑक्टोबरला हे शो होणार होते,
26 ऑक्टोबरला बांद्रा येथील हॉलच्या मालकीण पुर्णिमा शाह यांना बजरंग दलाच्या 3 कार्यकर्त्यांनी भेट घेऊन धमकावले. “मुनावरचे शो हिंदूविरोधी असल्याने ते रद्द कर, अन्यथा आम्ही तुमचा हॉल जाळून टाकू” अशा धमक्या त्यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच, काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्याच्या मुलाने मुनावर फारुकी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्याच्यावर हिंदू देवतांचा अपमान आणि अमित शहांविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनावरला अटक केली होती.
यावेळी देशभरातून मुनावरच्या बाजूने अनेकांनी आवाज उठवला होता. मात्र त्याच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्यामुळे 1 महिन्यानंतर मुनावरला जामीन मंजूर झाला. मात्र जेलमधून बाहेर आल्यावर देखील मुनावरने आपल्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकली होती.