मागील दोन वर्षात कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. कोरोनात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. तर अनेकांचे व्यवसाय देखील बंद पडले आहेत, याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे सामान्य जनता वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीला आहे. सध्या राज्यात पेट्रोलने १२० चा आकडा गाठला आहे.
२०१४ साली भाजपने मागील कॉंग्रेस सरकारला महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन धारेवर धरलं होते. अच्छे दिन आले तर महागाई कमी होणार या मुद्यावर भाजपने निवडणूक लढवली आणि भाजप पक्ष सत्तेत आला. मात्र महागाई काही कमी झाली नाही. देशभरात पेट्रोल आणि डिझेलने शंभरी गाठली आहे. तर घरगुती वापराचा गॅस आणि खाद्य तेलाच्या किंमती देखील गगणाला भिडल्या आहेत. आजच्या या लेखात आपण पेट्रोल आणि डिझेलचे मागील दहा वर्षातील भाव पाहणार आहोत.
वर्ष | पेट्रोल (रुपये प्रतिलिटर) | डिझेल (रुपये प्रतिलिटर) |
2011 | 58.5 | 37.75 |
2012 | 65.6 | 40.91 |
2013 | 66.09 | 48.63 |
2014 | 72.26 | 55.48 |
2015 | 60.49 | 49.71 |
2016 | 62.51 | 54.28 |
2017 | 63.09 | 53.33 |
2018 | 75.55 | 67.38 |
2019 | 72.96 | 66.69 |
2020 | 79.76 | 79.88 |
2021 | 114.81 | 105.86 |
दरम्यान, एवढी दरवाढ होऊन देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होयचं नाव घेत नाही, यामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ लागले आहेत. या कारणावरुन सध्या केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणावर टिका होत आहे.