आपल्या आजूबाजूला अनेक तरुण भारतीय सेनेत भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र या तरुणांच्या भावनांसोबत खेळण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय ज्यात दावा करण्यात आला आहे की 2022 च्या सैनिक भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. Fact check viral message soldier general duty age limit increased by 2 years
व्हाट्सअपच्या माध्यमातून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोत दावा करण्यात आला आहे की, सैनिक भरती 2022 साठी नवीन नियम जाहीर करण्यात आला आहे. या भरतीसाठी दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
या व्हायरल फोटोमुळे भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरूणांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. मात्र ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे. पीआयबीने केलेल्या फॅक्ट चेकनुसार भारत सरकारने 2022 च्या सैनिक भरतीसाठी वयोमर्यादेत कोणत्याही प्रकारची सूट दिली नाही.
पीआयबीने ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की सोशल मीडियावर सैनिक भरतीच्या वयोमर्यादा विषयी करण्यात आलेला दावा खोटा आहे. वयोमर्यादेत कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच अशा प्रकारचे खोटे मेसेजेस आणि फोटो शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
एक तस्वीर में दावा किया गया है कि भारत सरकार ने 2022 की सेना भर्ती के लिए आयु सीमा में 2 साल की छूट दी है।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 3, 2021
➡️ यह दावा फर्जी है।
➡️ आयु सीमा में ऐसा कोई बदलाव नहीं किया गया है।
➡️ कृपया ऐसी फर्जी संदेश/तस्वीर साझा न करें।
पढ़ें:https://t.co/4YFdn3U5o3 pic.twitter.com/SA7wQpA8VJ
भारतीय सेनेची अधिकृत वेबसाईट तपासली तर सैनिक (General Duty) साठी वयोमर्यादा साडेसतरा ते 21 वर्ष आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.
द भोंगाच्या माध्यमातून सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व तरुण तरुणींना आवाहन आहे की सैनिक भरतीच्या संदर्भातील माहितीसाठी भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीवर लगेच विश्वास ठेऊ नका.
भारतीय सेनेची अधिकृत वेबसाईट: https://joinindianarmy.nic.in/
वयोमर्यादेच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.