मागील एक महिना दुबईत विश्वचषक स्पर्धा सुरु आहे, विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात क्रिकेट रसिकांना चांगले सामने पाहायला मिळाले, न्युझीलंड विरूध्द इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरूध्द पाकिस्तान असे दोन्ही ही सामने अटीतटीचे झाल्याचे पाहायला मिळाले.
न्युझीलंडने इंग्लंडला आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे, आज विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ हा अशा स्पर्धांमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय, तर न्युझीलंडचा संघ सलग तिसऱ्या ICC स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकला आहे, २०१९ वनडे विश्वचषक, २०२१ टेस्ट चॅम्पियनशिप, आणि २०२१ टी२० विश्वचषक अशा सलग तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत न्युझीलंडचा संघ पोहचला आहे.
यामुळे केन विल्यमसनची न्युझीलंड सेना एकाच वर्षात दोन ICC स्पर्धा जिंकणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे, मात्र अशा सामन्यांत तुलनेने ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच वरचढ ठरला आहे यामुळे यंदाचा विश्वचषक कोणाचा हे आपल्याला आज संध्याकाळी कळेल.