मागील अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, मात्र १५ दिवस उलटले तरी राज्य सरकारला यावर काहीच तोडगा काढता आला नाही.
मात्र आंदोलन करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या खामगाव एसटी आगारातील कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
विशाल अंबलकर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून ते आगारात सहाय्यक मेकॅनिक म्हणून काम करायचे.
आपल्यावर देखील निलंबनाची कारवाई होईल, या भीतीने दोन दिवसापूर्वी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यत ४० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.
यामुळे राज्य सरकारला आतातरी जाग येणार का असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जाऊ लागला आहे.