क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून केंद्र सरकारकडून लवकरच क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात येणार आहे. या संदर्भात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर केलं जाणार आहे.
जगात सर्वाधिक जास्त क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारी लोक भारतात आहे, असं मानलं जातं. भारतीयांनी जवळपास सहा लाख कोटींची गुंतवणूक केली असल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या बाजारपेठांवर कोणाचंही नियंत्रण नाही.
त्यामुळेच केंद्र सरकारकडून क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात येणार आहे. आरबीआय बँकेने देखील पैशांचा घोटाळा आणि दहशतवादासाठी पैशांचा वापर यासाठी या क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात असल्याचं म्हटलं होतं.
तर दुसरीकडे आरबीआय बँकेकडून स्वतःचे डिजिटल चलन तयार केलं जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकाचं नाव द क्रिप्टोकरन्सी अँड रेगुलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी 2021 असं आहे.
या बिलाच्या माध्यमातून भारत सरकारकडून अधिकृत डिजिटल चलन तयार करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.